रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये कला (चित्रकला) व कार्यानुभव विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या कॅप्टन ठाकूर सभागृहात उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिलीप भातडे ( कार्यवाह -दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी )
व श्री सुजय कांबळे (कमर्शियल आर्टिस्ट -माजी विद्यार्थी पटवर्धन स्कूल रत्नागिरी ) उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध चित्रकार अनुजा कानिटकर यांनी व्यक्तिचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमास भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह श्री धनेश रायकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सुनील कीर, पालक प्रतिनिधी श्री चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रकला प्रदर्शनाच्या मांडणीचे नेतृत्व विभाग प्रमुख श्रीमती मुग्धा पाध्ये व उपमुख्याध्यापक श्री रुपेश पंगेरकर यांनी केले. कार्यानुभव विभाग प्रमुख पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली धामापूरकर सर, श्रीमती भाटकर मॅडम, गुरव मॅडम, श्री राठोड सर तसेच विद्यार्थी यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय गोरे सर, वैद्य सर, दामले सर, पाडळकर सर यांचे सहकार्य लाभले. अकरावी-बारावी विभाग प्रमुख मानसी चव्हाण मॅडम व नागवेकर मॅडम यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली एकूण 1000 पेक्षा अधिक चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून कार्यानुभव विभागाच्या 200 ते 250 विविध वस्तू आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे रांगोळी प्रदर्शन देखील विशेष आकर्षण ठरले. रांगोळी प्रदर्शनाची जबाबदारी गांधी मॅडम, शेट्ये मॅडम व तेंडुलकर मॅडम यांनी समर्थपणे पार पाडली.
कला कार्यानुभव रांगोळी प्रदर्शनास भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती नमिता कीर माजी कार्यवाह श्री दादा वणजू ,संस्थेचे विश्वस्त विनायक हातखंबकर सर तसेच माजी खजिनदार नचिकेत जोशी या मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली .
तसेच आजी-माजी संस्था पदाधिकाऱ्यांनी भेट दिली .
सोमवार, दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री दीपक मेंगाडे यांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले व शाळेच्या उपक्रमाचे अभिनंदन केले.
कला कार्यानुभव व रांगोळी प्रदर्शनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले असून पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Home महत्वाच्या बातम्या पटवर्धन हायस्कूलमध्ये कला (चित्रकला) कार्यानुभव व रांगोळी प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन












