उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त चादर व फळे वाटप

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसनिमित्त चादर व फळे वाटप
*युवक जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली केला कार्यक्रम
कणकवली;
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाचे युवक जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. आज पूर्वसंध्येला त्यांचा वाढदिवस आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप प्रसगी जिल्हा युवक उपाध्यक्ष भरत घाडीगावकर जिल्हा सरचिटणीस रूजाय फर्नांडिस  शिवडाव विद्यार्थी सदस्य रोहन पाताडे ग्रामपंचायत सदस्य युवती  विधान सभा अध्यक्ष सौ भावना तावडे, महीला उपाध्यक्ष ग्रा . सदस्या शोभा घाडीगावकर कृष्णा घाडीगावकर श्री गोसावी, रोहन सावंत रुपेश सावंत श्री हरमलकर आदी उपस्थित होते.