स्वरुपकुमार तळवडेकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद!

मसुरे | झुंजार पेडणेकर ; डोंबिवली येथील पलावा योग समुहातील सदस्य मूळ रत्नागिरी चांदोर येथील श्री. स्वरुपकुमार तळवडेकर यांनी सलग १०८ दिवस प्रतिदिन १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवत इंडिया बुक ऑफ रेकॉडमध्ये स्थान पटकावले.

त्यामुळे स्वरुपकुमार हे जागतिकस्तरावरही वैयक्तिकरीत्या हा विक्रम करणारी पहीली व्यक्ती ठरली आहे.
स्वरुपकुमार ह्यानी ह्या विक्रमाचे सारे श्रेय पलावातील योगगुरू आनंद चौहानसर, त्यांची आई, पत्नी भूमी तसेच पलावातील त्यांचे योग परिवारातील सहकार्‍याना देत त्यांचे आभार मानले आहे.
त्यांच्या ह्या यशाबद्दल क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर, सोनिया माने, आनंद चौहान, आरती प्रिया, दुर्गा पाटीदार, ज्योती जामदार, उदिता पांडे, पुष्पराज शर्मा आदीने त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.