चिपळूणमधील ‘वाशिष्ठीच्या कृषी प्रदर्शनासाठी खा. नारायण राणे यांचे आगमन

चिपळूण: 
चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायणराव राणे यांचे आगमन झाले असून कृषी महोत्सवाच्या प्रवेशद्वाराचे त्यांचे हस्ते उद्घाटन झाले. यानंतर खा. राणे यांनी अन्य मान्यवरांसमवेत कृषी महोत्सवाची पाहणी करून महोत्सवाचे भरभरून कौतुक करतांना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.