सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखम भोसले यांची टीजेएसबी बँक परिवारातर्फे नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी टीजेएसबी बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर सौ. स्नेहा फडके, डेप्युटी जनरल मॅनेजर तथा रिजनल हेड (गोवा, कर्नाटक व सिंधुदुर्ग) श्री. अरुण भट, सिंधुदुर्ग रिजन ऑफिसचे सिनियर मॅनेजर श्री. सचिन कुलकर्णी, रिजन ऑफिसचे मॅनेजर श्री. नितीन मोरजकर आणि सावंतवाडी शाखाधिकारी श्री. सुनील परब आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने टीजेएसबी बँकेला ‘गव्हर्मेंट बिझनेस’ संलग्न करण्याची सुविधा दिली आहे. याबाबतची माहिती सौ. फडके यांनी नगराध्यक्षांना दिली. या सुविधेमुळे सरकारी कामांशी संबंधित बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होणार असून, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
आपल्या निवडीबद्दल बँकेने दाखवलेल्या स्नेहाबद्दल नगराध्यक्षा
सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी आभार मानले. तसेच नगरपरिषदेच्या कामात बँकेला लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.












