कामगार नेते अशोक सावंत यांनी भेट घेत दिला आधार ; सोमवारी कंत्राटी वीज कामगार यांची महत्वाची बैठक
मालवण | प्रतिनिधी : विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या कुडाळ येथील कर्मचारी धनंजय फाले यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु आहेत. कामगार नेते अशोक सावंत यांनी गोवा बांबुळी येथे जाऊन जखमी धनंजय यांची विचारपूस करत धीर दिला. तसेच नातेवाईकांशीही चर्चा केली.
दरम्यान कंत्राटी विज कर्मचाऱ्यांना विज खांबावर चढण्याबाबत आदेश नसतानाही अधिकाऱ्यांकडून त्यांना जबरदस्तीने चढवले जात आहे. याबाबत सोमवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील भूमिका ठरणार असल्याचे अशोक सावंत यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागात असलेल्या धनंजय याच्यावर उपचार सुरु आहेत. अशोक सावंत यांनी उपचार घेत असलेल्या धनंजय याची विचारपूस करत नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, कणकवली विभाग जिल्हाध्यक्ष रुपेश पवार, उपाध्यक्ष रुपेश जाधव आदी उपस्थित होते.










