रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील नाखरे येथील आंबा बागेत वणव्याने लागलेली आग आटोक्यात आणताना बागेतील कामगाराचा भाजून आणि धुरामुळे श्वास कोंडून मृत्यू झाला. ही घटना रविवार 11 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. सुमारास घडली.
भरत दिगंबर धारगळकर (55,मूळ रा.वेंगुर्ला, सिंधुदुर्ग सध्या रा. रामेश्वरवाडी नाखरे, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. भरत धारगळकर हा शुभांगी वसंत वैद्य यांच्या आंबा बागेत इतर कामगारांसोबत देखभालीचे काम करायचा. रविवार त्या बागेत वणवा पेटल्याचे पाहून सर्व कामगार झाडाच्या ओल्या टाळानी आग विझविण्याच्या प्रयत्न करत होते. त्यावेळी आगीत ठिकठिकाणी भाजून आणि धुराच्या लोटांनी खाली पडून श्वास कोंडल्यामुळे भरतचा मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












