मांडकी नं ३ शाळेला अँड्रॉइड टीव्ही संचाची भेट

गौरव पोंक्षे माखजन
सावर्डे नजीक जिल्हा परिषदेच्या मांडकी शाळा नं ३ मध्ये अँड्रॉइड टीव्ही संच भेट मिळाला आहे.आमदार शेखर निकम,उमेश राजेशिर्के यांच्या माध्यमातून ही देणगी मिळाली आहे.
ही देणगी मिळण्यासाठी तेजस घाणेकर,उमेश शिर्के अरूण घाणेकर, नारायण घाणेकर महेश घाणेकर बाबाजी घाणेकर, मारुती खांबे,शांताराम घाणेकर,अनंत घाणेकर,प्रकाश हुमणे,अमोल घाणेकर,सचिन घाणेकर,सुहास रसाळ,दत्ताराम घाणेकर यांनी प्रयत्न केले.
देणगी स्वीकारताना शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक ,शिक्षक शिक्षकांची नावे श्री.प्रदीप कदम,श्री.संकेश गायकवाड,श्री.राजेश पवार
सौ.संचिता सावर्डेकर आदी उपस्थित होते.