किरण रेवाळे भरणार आज मनसेतर्फे उमेदवारी अर्ज

भांबेड पंचायत समिती गणातील निवडणूक होणार रंगतदार

लांजा (प्रतिनिधी) :उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भांबेड पंचायत समिती गणातून किरण रेवाळे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती तसेच महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर लांजा तालुक्यातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संपर्क अध्यक्ष असलेले किरण प्रभाकर रेवाळे हे आज भांबेड पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील .
मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून किरण रेवाळे हे आज बुधवारी दुपारी आपला पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार असून यावेळी त्यांच्यासोबत शेकडो समर्थक असणार आहेत. त्यांच्या या उमेदवारीमुळे भांबेड पंचायत समिती गणातील निवडणूक ही रंगतदार आणि अटीतटीची होणार आहे.