“प्रहार डिजिटल” च्या बातमीने प्रशासनाला जाग !

बांधकाम विभागाची, एसटी बस फेऱ्या चालू करण्याची महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला विनंती करण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र !

ब्रिज पडल्यानंतर सुद्धा, फोंडा स्थानकावरून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या सुरक्षित पर्यायी मार्गाने जाव्यात — विद्यार्थी, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांची आग्रही मागणी !

फोंडाघाट/कुमार नाडकर्णी — सोशल मीडियावरील पालक, विद्यार्थी यांच्या आग्रही मागणीचा विचार करून, कार्यकारी अभियंता यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना जा.क्र ३७३/ २०२५- २६ अन्वये विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या बस फेऱ्या चालू ठेवण्याची विनंती केली आहे. याबद्दल पालक, विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग व कोल्हापूर एसटी प्रशासनाला सुद्धा जिल्हाधिकारी यांनी त्वरित आदेश देऊन, गैरसोय टाळावी अशी आग्रही मागणी केली आहे ….

 

 

 

वस्तुतः विद्यार्थी,पालक यांचे सह कारिवडे,करंजे, हसणे, दाजीपुर व मध्यंतरी गावातील रुग्ण, ग्राहक, व्यापारी सर्व फोंडाघाट उतारपेठेवर अवलंबून आहेत. एसटी गाड्या बंद झाल्यास सर्वांना त्रासासह आर्थिक भुर्दंड ही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याची पाहणी एसटी प्रशासनाने केली असल्याने, फोंडा स्थानकावरून कोल्हापूरला जाणाऱ्या व कोल्हापूरहून येणारे गाड्या सुरक्षित व सक्षम पर्यायी रस्त्याने कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात. अशी मागणी सर्व ग्रामस्थ, व्यापारी, रुग्णांनी केली होती. त्याचाही गांभीर्याने जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग आणि एसटी प्रशासनाने विचार करावा. अशी आग्रही मागणी होत आहे…