लांजा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी
लांजा तहसीलदारांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर
लांजा | प्रतिनिधी : मणिपूर आणि देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लांजा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन सोमवारी २४ जुलै रोजी लांजा तहसीलदारां मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर करण्यात आले.
देशभरात सातत्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचार संदर्भात सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी बंगालमधील पंचायतीच्या निवडणुकी वेळी एका महिला उमेदवाराला विवस्त्र करून तीची धिंड काढण्यात आली होती. तर बंगालमध्येच चोरी करणाऱ्या दोन महिलांना विवस्त्र करून महिलांच्या जमावाने मारहाण करत पोलिसांच्या देखत धिंड काढली होती .याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका हिंदू तरणीवर एका धर्मांधाने अत्याचार करून तीची हत्या केली होती. आणि बंगाल पोलिसांनी तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून फरफटत नेला होता. मणिपूर येथील चुराचंद्रपूर या भागात दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली तर येथील अन्य एका घटनेत मैतेई समाजातील ८० स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले.
या सर्व घटना निंदनीय असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. त्यामुळे यापुढे देशभरातील सर्व राज्यांमध्ये अत्यंत कठोर नियम,₹ कायदे करून महिलांच्या जीविताची आणि अब्रूचे रक्षण करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .#निवेदन सादर करताना डॉक्टर समीर घोरपडे, भैरूलाल भंडारी, ॲड रुपेश गांगण तसेच अविनाश बागाव, रुपेश चव्हाण, शिवाप्पा उकली, सुनील देवळेकर, ओंकार जेधे ,रुपेश चव्हाण आदी उपस्थित होते.










