रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील गावखडी जेट्टी जवळ समुदात बुधवारी सकाळी 8.30 वा. सुमारास वृध्द महिलेचा मृतदेह मिळून आला.
प्रमिला महादेव नागवेकर (71,रा. गावखडी भंडारवाडी,रत्नागिरी) असे समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. याबाबत संजय सदाशिव पाटील (63,रा.गावखडी भंडारवाडी,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, प्रमिला नागवेकर यांचे मानसिक संतुलन बिघडलेले होेते.
मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वा. सुमारास त्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी 8.30 वा. सुमारास गावखडी जेट्टीपासून सुमारे 50 मिटर अंतरावर समुद्राच्या पाण्यात त्यांचा उताण्या स्थितीत मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत पूर्णगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











