पॉइंट ऑफ सेल्स नेटवर्कद्वारे विमा सेवा दारात
पुणे विभागातून मोहिमेला सुरुवात
ग्राहकांपर्यंत थेट विमा सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने वनसर्कल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडने नवा उपक्रम हाती घेतला आहे. लहान शहरे आणि ग्रामीण भागात पॉइंट ऑफ सेल्स व्यक्तींचे नेटवर्क तैनात करण्यात येणार आहे. सुरुवातीला ट्रक आणि कार विम्याच्या नूतनीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे या क्षेत्रात विम्याचा विस्तार करण्याची मोठी संधी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पुणे विभागातून या मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे.
पुणे : ग्राहकांच्या दारात विम्याचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी वनसर्कल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पॉइंट ऑफ सेल्स व्यक्तींचे नेटवर्क लहान शहरे आणि ग्रामीण भागात कार्यान्वित करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश विमा सेवा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या करणे हा आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ट्रक आणि कार विम्याच्या नूतनीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या लोकसंख्येमुळे या क्षेत्रात विम्याचा प्रवेश अधिक वाढवण्याची संधी असल्याचे कंपनीचे मत आहे. जीवन आणि सामान्य विम्यासाठी थेट दलाल म्हणून काम करणारे हे स्टार्टअप पुणे विभागातून आपल्या उपक्रमाला सुरुवात करणार आहे.
या नेटवर्कमधील कर्मचाऱ्यांना विमा उत्पादनांच्या विविध श्रेणींबाबत सल्ला देण्यासाठी प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य विमा उपाय सुचवणे हा या उपक्रमाचा मुख्य भाग असेल.
वनसर्कल इन्शुरन्स ब्रोकर्सचे चेअरपर्सन जदीप-देवरे म्हणाले, “टियर-२ ते टियर-४ शहरे आणि ग्रामीण भारतामध्ये विम्याची सुलभता व परवडणारी क्षमता सुधारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी नावीन्यपूर्ण, ग्राहक-केंद्रित आणि पारदर्शक विमा उत्पादने देण्यासाठी आमची टीम कटिबद्ध आहे.”











