वायरी येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना भाजपच्या माध्यमातून मदतीचा हात

 

मालवण | प्रतिनिधी : अतिवृष्टीत मालवण शहरातील वायरी हिंदळेकरवाडा येथील श्रीमती चंद्रप्रभा हिंदळेकर यांच्या घराची भिंत आणि छप्पर कोसळून नुकसान झाले. याची माहिती मिळताच मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. कुटुंबाची तातडीची गरज म्हणून मोठी ताडपत्री स्थानिक व सहकारी यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त छप्परावर घालून दिली.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, येथील अरुण तुळाजी आडेलकर यांच्या घराचेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांना १०० चिरे आणि १० सिमेंटची पोती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक आप्पा लुडबे, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, भाई मांजरेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शुभम लुडबे, रोहन आचरेकर, चंद्रकांत मयेकर यासह मोहन चव्हाण, प्रवीण मिठबावकर, सिल्व्हिस्टर फर्नांडिस, अरुण आडेलकर, गणेश पेडणेकर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्फत प्रयत्न करण्याची ग्वाही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे कुडाळ, मालवण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती काळात भाजप कार्यकर्ते जनतेच्या सेवेत असल्याचे आचरेकर, पाटकर यांनी सांगितले.

फोटो : वायरी येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. (अमित खोत, मालवण)