जिल्हा परीषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पहिल्या चार तासात २६.६३ टक्के इतके मतदान

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ व पंचायत समितीच्या १२ गणांसाठीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शनिवारी सकाळी ७.३० वाजता प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात पहिल्या चार तासात ११.३० वाजेपर्यंत तालुक्यातील १९५ मतदान केंद्रावर २६.६३ टक्के इतके मतदान झाले आहे.
तालुक्यात काही ठिकाणी इव्हीएम मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मतदानात खंड पडला. मात्र प्रशासनाने याची दखल घेत तांत्रीक बिघाड दुर करत पुन्हा मतदान सुरळीत सुरू केले.
राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा परिषद गणांतून ६ जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील १९५ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० ते ११.३० या चार तासांच्या कालावधीत २६.६३ टक्के इतके मतदान झाले.
जुवाठी, बांदिवडे, विलये, मोसम, साखरीनाटे व अन्य काही भागात मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे मतदानात काही वेळ खंड पडला. मात्र हा बिघाड दुर करून मतदान प्रकिया सुरू करण्यात आली. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.