माजी मुख्याध्यापक बी डी पाटील यांचे निधन!

मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक श्री बाबासाहेब धोंडीराम उर्फ बी. डी. पाटील (70 वर्ष ) यांचे ६ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ४.३० वा. दरम्यान अल्पशा आजाराने सांगली येथे निधन झाले. मुणगे येथे 35 वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृती घेतली होती. गणित विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. अजय आणि विजय पाटील यांचे ते वडील होत. श्री भगवती एज्युकेशन सोसायटी, श्री भगवती हायस्कूल यांच्यावतीने श्री भगवती हायस्कूलमध्ये श्री. बाबासाहेब पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.