गौरव पोंक्षे | माखजन
यावर्षी अपेक्षे पेक्षा अधिक आंब्याना मोहोर् आला होता.दीर्घ काळ झालेला पाऊस आणि त्यानंतर पडलेली कडाक्याची थंडी यामुळे,आजवर किचाच नं मोहोरलेल्या आंब्यांच्या झाडांना देखील मोहोर आला होता.परंतु अलीकडे सतत होत असलेल्या मळभी वातावरणामुळे, मोहोर काळा पडण्यास प्रारंभ झाला आहे.त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.जानेवारी च्या अखेरीस अपरात्री पाऊस ही पडला होता.याचा एकूणच फटका आंबा व काजूच्या मोहोराला बसलेला पाहायला मिळत आहे.
कोकणातील आंबा व काजूचे उत्पादन हे पूर्णपणे निसर्गातील वातावरणाच्या चढ उतारावर अवलंबून असल्याचे,पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.उशिराने आलेला मोहोर आणि त्यात काळा पडत असल्याने सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.













