दे. शंकरराव गवाणकर महाविद्यालयची विद्यार्थिनी सिद्धी सावंत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी :

अनुभव शिक्षा केंद्र, साद टीम कणकवली व श्रीराम वाचनालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री किरणजी ठाकूर सचिव श्री प्रभाकर पाटकर व खजिनदार पंढरी परब संस्थेचे समन्वयक डॉ. मिसाळे सिनिअर एक्झिक्युटिव्ह श्री प्रवीण प्रभू केळुसकर व एक्झिक्यूटिव्ह डॉ. महेश सातवसे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.. सदर स्पर्धेसाठी प्राचार्य यशोधन गवस यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचबरोबर शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Sindhudurg