ओझरम मापारवाडी येथील युवकाची याची गळफास लावून आत्महत्या

crime

बाव ते सोनवडे जाणा-या रस्त्यालगत आढळला मृतदेह

कुडाळ प्रतिनिधी
ओझरम मापारवाडी येथील संकेत सुर्यकांत बाणे या १९ वर्षीय युवकाचा मृतदेह बाव गावातील टिळम टेंब या ठिकाणी काजुच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला असुन या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद करण्यात आली आहे. ही घटना सकाळी ९ वा.च्या सुमारास निदर्शनास आली. ही आत्महत्या का केली याचे बाबत नेमके कारण समजु शकले नाही.

या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात बाव गावचे पोलीस पाटील शंकर बांबुळकर यांनी खबर दिली की, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता गावचे सरपंच नागेश परब यांनी त्यांना गावातील टिळम टेंब या ठिकाणी रस्त्याच्या बाजूस असलेल्या एका काजुच्या झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी पाहून खात्री केली असता काजूच्या झाडाच्या फांदीला गळफास असलेल्या स्थितीत एका अज्ञात युवकाचा मृतदेह लटकताना मृतदेह होता. तसेच झाडाच्या बाजुला बाजूला होंडा शाईन मोटरसायकल उभी करून ठेवलेली होती. घटनास्थळी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस मंगेश जाधव यांनी जात पंचनामा केला. दरम्यान अधिक तपास करताना संबंधित युवक हा कणकवली तालुक्यातील ओझरम मापारवाडी येथील संकेत सुर्यकांत बाणे (वय १९ ) आहे अशी माहिती मिळाली. प्राथमिक तपासात संकेत याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान घटनास्थळी संकेत याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजु शकले नसुन दरम्यान संकेत याच्याकडे एक चिठ्ठीही सापडली असल्याचे समजत असून चिठ्ठीतील मजकूर समजू शकला नाही. दरम्यान संकेत याने बांव येथे येऊनच आत्महत्या का केली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम व पोलीस मंगेश जाधव यांनी पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस मंगेश जाधव करत आहेत.