मसुरे | झुंजार पेडणेकर : आंगणेवाडी ग्राम विकास मंडळाचे सचिव अर्जुन उर्फ काका आंगणे आणि बाबू आंगणे यांचा श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते देवस्थानच्या स्वागत कक्षात काका आंगणे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तासह बाबू आंगणे, तनुराज आंगणे, महेश आंगणे, तुषार आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे, गणेश आंगणे, सचिन आंगणे,आबा आंगणे, अक्षय आंगणे, चंदू आंगणे, विनोद आंगणे आदी आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.












