“माझी वसुंधरा अभियान ५.०” : वेंगुर्ला न.प. कोकण विभागात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम

पुढच्या वर्षी राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करणार : नगराध्यक्ष दिलीप गिरप

वेंगुर्ले : दाजी नाईक वेंगुर्ला नगरपरिषद यांनी “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत १५,००० पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून रोख रुपये ७५ लाखांचे पारितोषिक मिळविले आहे. सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे हे यश संपादन करता आले आहे. सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळाला असून पुढच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.