घराच्या भिंती कोसळल्या ; एकजण जखमी

मालवण दांडी येथील घटना ; महसूल प्रशासनाने केला पंचनामा

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे पडझडीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी रात्री दांडी दुधवडकरवाडी येथील तोंडवळकर कुटुंबीय राहत असलेल्या घराच्या भिंती कोसळल्या. यावेळी भिंतीचा काही भाग अंगावर पडल्याने गुरू महेश तोंडवळकर हा मुलगा जखमी झाला आहे.भिंती कोसळल्या त्यावेळी गुरू याची आई सोनाली महेश तोंडवळकर व गुरू हे घरात होते. गुरू याच्या अंगावर भिंतीचा काही भाग कोसळल्याने तो जखमी झाला. नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.गुरुवारी तलाठी पासते व महसूल कर्मचारी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.