ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावातील तमाम शिवप्रेमी युवा युवती यांच्या वतीने 19 फेब्रुवारी शिजयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी या सोहळ्याला प्रारंब होणार आहे सकाळी 8.30 वाजता रवळनाथ वाचनालयाकडून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून ओटवणे रवळनाथ Mathematics पर्यंत ही भव्य रॅली निघणार आहे या मिरवणुकीत विविध साहसी खेळ दाखविले जाणार आहे.अजय आरोसकर, सिद्धी राऊळ यांचे साहसी खेळ सादर होणार आहे. सकाळी 9.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, 10 वाजता श्री रवळनाथ विद्यामंदिरच्या दहावी 2012-13 च्या माजी विधार्थ्यानी बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील छत्रीचे अनावरण करण्यात येणार आहे. 10 30 वाजताउपस्थित प्रमुख मान्यवरांचे भाषणे. दिवसभर विविध कार्यक्रम त्यानंतर रात्रौ 8 वाजता रवळनाथ विद्यामंदीर ओटवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट दाखविण्यात येणार आहे तरी सर्व शिवप्रेमी यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याच आवाहन करण्यात आले आहे.












