स्विमिंग ग्रुपच्या वतीने शिवरायांना अभिवादन
अक्कलकोट | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्यचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छत्रपती शिवाजींच्या नावानेच सुरू असलेले पाहायला मिळते. त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द आजही आपल्या बांधवांना प्रेरित करते म्हणून छत्रपती शिवरायांचे शौर्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांचे सुपुत्र तथा युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट स्विमिंग ग्रुपच्या वतीने ग्रुपचे संस्थापक तथा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना प्रथमेश इंगळे यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून प्रत्येकाने महाराजांची जयंती साजरी करावीच, परंतु आजच्या एकविसाव्या शतकातील तरुणाईने महाराजांच्या आदर्श विचारसारणीचे मापदंड व त्यांच्या यशोगाथेची महती आत्मसात केल्यास शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल असे मनोगत व्यक्त करून महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव केला. याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य अमर पाटील यांच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती, तसेच अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त स्विमींग ग्रुपच्या व श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने अमर पाटील यांचा श्री.स्वामी समर्थांचं कृपावस्त्र, प्रसाद, देवून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, बाबा सुरवसे,
अमर पाटील, अशोक कलशेट्टी, विश्वनाथ देवरमनी, कुमार हतुरे, सुरेश पाटील, शिवशरण अचलेर सर, सुरेश वाले सर, सुनिल पवार, स्वप्निल गायकवाड, डॉ.हिरण्णा पाटील, चंद्रकांत सोनटक्के, रमेश शिंदे, युवराज सोनटक्के, तन्मय इचगे, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, मल्लिनाथ माळी, अरविंद पाटील, शैलेश राठोर, अमर पाटील, श्रीकांत झिपरे आदींसह समस्त स्विमिंग ग्रुपचे सदस्य व शिवभक्त उपस्थित होते.













