नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर दिली मोठी जबाबदारी
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. प्रशांत यादव यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली.
ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. प्रशांत यादव यांनी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी महत्वाची भूमिका बजावल्याने पक्षाला चिपळूण आणि परिसरात मोठे यश प्राप्त झाले आहे. संघटनात्मक रचनेमधील त्यांच्या कामाची पक्षाची दखल पक्षाने घेतल्यानंतर ही घोषणा झाली आहे.
या निवडीनंतर प्रशांत यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, रत्नागिरी दक्षिण भागात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असेल.












