1 ऑगस्ट पर्यंत पावसाचा यलो अलर्ट
रत्नागिरी | प्रतिनिधी : गेली दोन आठवडे मुसळधार पडणारा पाऊस आता काहीसा विश्रांती घेणार असल्याचं चित्र दिसत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्याला 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट होता. या कालावधीत काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज होता. तर 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे दोन आठवडे रत्नागिरी जिल्हाला रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना आता मात्र जिल्ह्यातील पावसाचा हा जोर ओसरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच दरडी कोसळणं, पूर येणे यामुळे विस्कळीत झालेलं रत्नागिरी जिल्ह्यातलं जनजीवन पूर्वपदावर येईल अशी शक्यता आहे.










