सुमारे 150 बांधकाम कामगारांना मिळाला लाभ
गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे तब्बल १५० बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काचे भांड्याचे किट उपलब्ध करून त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी पात्र कामगारांना शासनाच्या विविध योजना चालू आहेत. यातच विशेष म्हणजे नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना शासनातर्फे दैनंदिन जीवनावश्यक भांड्यांचे किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील व गरीब गरजू बांधकाम कामगारांना मिळावे म्हणून गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गोयथळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत बांधकाम कामगार म्हणून २०० नाव नोंदणी करण्यात आली आहेत. त्यातून १५० बांधकाम कामगारांना भांडी व इतर योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.











