पानवल येथे अज्ञात बालेरोची धडक बसून दुचाकीवरील दोघे जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पानवल येथे अज्ञात बालेरोची दुचाकीला धडक बसून अपघात झाला.अपघाताची ही घटना मंगळवार 25 जुलै रोजी सकाळी 9.30 वा.घडली असून दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. दुर्वेश गजानन पांचाळ, गजानन विश्वनाथ पांचाळ ((रा.आंबवकोंड कदमराव सुतारवाडी संगमेश्वर,रत्नागिरी) अशी दुचाकीवरील जखमींची नावे आहेत.मंगळवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीए-7319) वरुन हातखंबा तिठा बाजुकडून येत होते.त्याच सुमारास अज्ञात बालेरो चालक आपल्या ताब्यातील बोलेरो घेउन हातखंबा देसाईवाडी फाटा येथून मुख्य रस्त्यावर येत होता.ही दोन्ही वाहने पानवल येथील साईराम ट्रेडर्स दुकानासमोर बोलेरोची पांचाळ यांच्या दुचाकीला उजव्या बाजुला धडक बसून हा अपघात झाला.अपघात होताच बोलेरो चालकाने पळ काढला असून दुचाकीवरील दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.