
गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटनश्रेत्रात एटिवी बाईक, फोटो ग्राफर, घोडे व्यावसायिक, उंट व्यावसायिक, रिमोट बाईक, हाथ गाडी इ. व्यवसायात परप्रांतीय लोकांकडून झालेले अतिक्रमण रोखण्यासाठी आज मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक भूमिपूत्रानांच याठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे . यासाठी आपण लवकरात लवकर सर्वमान्य तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या हक्कासाठी आपल्या पद्धतीने संघर्ष करेल अशी भूमिका मनसेने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
यावेळी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे , श्री.नितीश गैमार, तालुका सचिव श्री. अभिलाष पिलणकर, विभाग अध्यक्ष श्री. अखिल शाहू, श्री.सोम पिलणकर, श्री. संकेत गवाणकर, आशिर्वाद सुर्वे, सचिन सांडीम आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.








