मसुरे | प्रतिनिधी
मुणगे सडेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक श्री देवी भगवतीचे सेवेकरी प्रभाकर सदाशिव घाडीगावकर ( ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. येथील श्री देवी भगवती मंदिरामध्ये ते सेवेकरी म्हणून काम पहायचे. मुणगे गाव आणि पंचक्रोशीत ते गावकर म्हणून परिचित होते. पश्चात पत्नी, विवाहित दोन मुलगे ,एक मुलगी, नातवंडे भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.












