बांद्यात खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खासदार चषक’ क्रिकेट स्पर्धा

८ ते १२ मार्च दरम्यान रणधुमाळी

बांदा : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे ८ ते १२ एप्रिल दरम्यान ‘खासदार नारायण राणे चषक’ भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये असेल, अशी माहिती माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य जावेद खतीब व बाळू सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेसाठी बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर व इतर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एक गाव एक संघ व दोन आयकॉन खेळाडू अशा पद्धतीची असेल असे जाहीर करण्यात आले.

यावेळी गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, दीपक सावंत, श्याम मांजरेकर, सुनील धामापूरकर, साईनाथ धारगळकर, राजा सावंत, निलेश नाटेकर, संदीप बांदेकर, आपा धामापूरकर, तुषार धामापूरकर, मंदार धामापूरकर, प्रवीण नाटेकर, बंटी गवंडळकर, बाबा गाड, ऋषी हरमलकर, गौरव नाटेकर, अर्णव स्वार, साई सावंत मोर्ये, सिद्ध मोर्ये, विकी कदम, स्वप्निल सावंत, बिट्टू परब, प्रथमेश मोर्ये, सोहेल जमादार, सोहेल खान, रितेश धामापूरकर, शिवनाथ मळेवाडकर, रूपेश बांदेकर, गुरु बिले, प्रसाद नाईक, विलास पावसकर आदी क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.