नौकेवरील खलाशांना वाचविण्यात यश
नौकेचे कोट्यावधीचे नुकसान
देवगड : प्रतिनिधी : मच्छिमारी करून देवगड बंदरात परतत असताना अलमका ही पर्ससीन नौका वाèयाचा वेग आणि लाटांच्या तडाख्यात सापडल्याने समुद्रात बुडाली.या नौेकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते.या सर्व खलाशांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे मात्र ही संपूर्ण नौका बुडाल्याने नौकेचे कोेट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.ही घटना रविवारी दुपारी १ वा.सुमारास देवगड समुद्रात मिठमुंबरी ते देवगड पवनक्की समोर समुद्री पट्टयात घडली.
देवगड येथील हनिफ मेमन यांची अलमका ही पर्ससीन नौका रविवारी दुपारी देवगड समुद्रात मच्छिमारी करत होती.या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी कार्यरत होते.मच्छिमारी केल्यानंतर ही नौका देवगड बंदरात येण्यास निघाली यावेळी उपरचा वाऱ्याचा वेग अधिक असल्याने व पाण्यालाही करंट असल्याने लाटांच्या तडाख्यात ही नौका सापडून बुडाली.ही नौका बुडत असतानाच त्या नौकेवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या नौकेच्या बाजुलाच मेमन यांची खतिजा ही पर्ससीन नौका मच्छिमारी करीत होती.या नौकेसह नजिक मच्छिमारी करणाèया स्थानिक मच्छिमारांनी तात्काळ समुद्रातील घटनास्थळी जात अलमका या नौकेवरील सर्व खलाशांना सुखरूप वाचविले.दरम्यान बुडलेल्या अलमका या नौकेला स्थानिक मच्छिमारांनी आपल्या नौकांच्या सहाय्याने देवगड बंदरात आणले.रात्री उशिरा देवगड बंदरात ही नौका जेसीबीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी नौकेचे सुमारे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.या नौकेचे इंजिन,जाळी, मासळी व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवण समुद्रात शनिवारी दुपारी पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली होती.या घटनेच्या दुसया दिवशीच रविवारी देवगड समुद्रात मासेमारी नौका बुडाली.











