अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी ठाकर समाजाचे मांडले होते प्रश्न
मुद्दामहून त्रास देणाऱ्या त्या अधिकाऱ्याची बदली करावी म्हणून केली होती मागणी
संतोष राऊळ (कणकवली) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला जातीचे दाखले वेळेत मिळावेत. ठाकर समाजाची जात पडताळणी करून दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी. आणि ठाकर समाजाची केली जाणारी ससे होलपट थांबवावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली होती. या मागणीची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. आदिवासी विकास मंत्री गावित यांनी तातडीने कारवाई हाती घेतली. आमदार नितेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे यंत्रणा सतर्क झाली,त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाने, अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
यावेळी आदिवासी मंत्री यांना जात पडताळणी उपाध्यक्ष श्री. पावरा यांची बदली करेबाबत सांगितले.यासाठी समाजाच्या वतीने आमदार राणे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी वेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, सचिव दिलीप म्हस्के, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, मालवण तालुका अध्यक्ष रुपेश गरुड, कणकवली तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर, जिल्हा सदस्य राजन रणसिंग, साई यादव, सुनील ठाकूर, समीर ठाकूर, सचिन ठाकूर, अच्युत मस्के, विठ्ठल सिंगनाथ, सुधीर गंगावणे, अमित ठाकूर सचिदानंद ठाकूर, प्रशांत मराठे, सुहास ठाकूर, अविनाश ठाकूर, धनंजय ठाकूर,उमेश ठाकूर, अविराज मराठे आदी सह समाज बांधव उपस्थित होते.











