फोंडाघाट, कोरगावकरवाडी गणेश मंदिर येथे सोमवार २७ एप्रिल रोजी ” नीलमाधव ” नाट्यप्रयोगाचे आयोजन !

 

खास लोकाग्रहास्तव आनंद चिके मित्र मंडळ आणि गणेश मित्र मंडळ यांचे व्यवस्थापन!

फोंडाघाट : जगन्नाथ पुरीच्या जगन्नाथाची स्थापना, याचे गुढ रहस्य पटवून देणारा, रहस्यमय, संघर्षमय आणि तुषार नाईक यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकारलेले पौराणिक दशावतारी नाट्यपुष्प “नील माधव” खास लोकाग्रहास्तव आयोजित करण्यात आले आहे. गणेश मित्र मंडळ, कोरगावकरवाडी व आनंद चिके यांचे सौजन्याने गणेश मंदिर येथे सोमवार तारीख २७ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता हे नाटक होणार आहे. नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतारी लोकनाट्य मंडळ, मोचेमाड- वेंगुर्ला चे नामांकित कलाकार यांचा यामध्ये सहभाग आहे. पंचक्रोशीतील नाट्य रसिकांनी या अभूतपूर्व नाट्याचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे….