आबलोली : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली ता.दापोली या विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पार पडली.ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.प्रणाम बबन भानशे, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु.दिशा दीपक भुवड हिची निवड झाली. तसेच क्रीडा मंत्री म्हणून कु.वेदांत सचिन जोशी, सांस्कृतिक मंत्री कु.दिया चंद्रशेखर वेदपाठक, सहल मंत्री कु.धनश्री सूर्यकांत भारसिंग, स्वच्छता व आरोग्य मंत्री कु.आदित्य अनंत हुमणे, शालेय शिस्त मंत्री कु.सुरभी महिंद्र आग्रे, विज्ञान मंत्री कु.शाहिद इस्माईल उमरोलकर, वस्तू भांडार मंत्री समाईरा नवल वेदपाठक, वाचनालय मंत्री कु.प्रणाली मिंटू मेहता हे सर्व या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत विजयी झाले. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक गुढेकर एस. व्ही. यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही व गुप्त मतदान पद्धत याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकीळ एम. पी. यांनी भारतातील लोकशाही व निवडणूक यांचा परस्पर संबंध याविषयी मार्गदर्शन केले. शालेय निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी निवडणूक अर्ज भरणे,अर्ज मागे घेणे,प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.विद्यालयातील सहाय्यक शिक्षक ओवाळ पी.बी.,चव्हाण आर.एम.,शिवानी महाजन व शैलेश आग्रे यांनी निवडणूक शांततेत व लोकशाही मार्गाने पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकीळ एम. पी., शालेय समिती चेअरमन श्रीमती गीतांजली वेदपाठक, सर्व सदस्य पालक शिक्षक संघ, सदस्य व ग्रामस्थ यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी ही निवडणूक पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. निवडणुकीचे संयोजन विभाग प्रमुख गुढेकर एस. व्ही. यांनी केले होते.











