वेंगुर्ले : दाजी नाईक
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान व आदिशक्ती पुरस्कार प्रदान कार्यक्रम जाहीर केला आहे. या अभियानात वेंगुर्ले तालुक्यात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या केळूस ग्रामपंचायतचा आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
वेंगुर्ले तालुक्यात ग्रामपंचायत पेंडर द्वितीय, व ग्रामपंचायत अणसूर ने तृतीय क्रमांक मिळविला आहे. दरम्यान आज प्रथम आलेल्या केळुस ग्रामपंचायतीचा ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, आदिशक्ती अभियान समिती अध्यक्ष श्रीम. संजीवनी गावडे, सचिव श्रीम राजकिर्ती केरकर, सरपंच श्री. योगेश शेट्ये, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विवेक वजराटकर उपस्थीत होते.













