मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त 19 मार्चपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ मार्च रोजी तिरुपती बालाजी सत्व वस्तूंचा आगमन सोहळा प्रारंभ.श्री पावणादेवी मंदिर हडपीड ते शिरगांव श्री पावणादेवी मंदिर ते निमतवाडी ते श्री स्वामी समर्थ मठ हडपीड.
20 मार्च रोजी सकाळी ५:०० वाजता गणेश पूजन, पादूका पूजन, अभिषेक, होमहवन, सकाळी ६:०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा,
सकाळी ९:०० वाजता तिरुपती बालाजी देखावा दर्शन, उदघाटन सोहळा,सकाळी १० वाजता लघुरुद्र, कुंकूमार्चन,
दुपारी १२:०० वाजता पालखी सोहळा,दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १:०० : वाजता महाप्रसाद, रात्री ७:०० वाजता महाप्रसाद, रात्री ७ ते रात्रौ ९ वा. आई पावणादेवी समई नृत्य (किंजवडे), रात्रौ ९ वा. श्री हरिहरेश्वर नाट्यमंडळ तळवडे – लब्देवाडी हरिहरेश्वर सेवा मंडळ मुंबई ‘रात्रीस खेळ चाले’ नाट्यप्रयोग होणार आहे.उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर धाकू राणे, सचिव श्री. नंदकुमार तुकाराम पेडणेकर, खजिनदार श्री. ज्ञानेश्वर शां. राऊत
विश्वस्त श्री. मोनिष नंदकुमार पेडणेकर,
श्री. अभिषेक प्रभाकर राणे यांनी केले आहे.










