आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात रूग्णांना फळवाटप

एन. आर. प्रतिष्ठान,रविदादा सहयोगी मित्रमंडळ व राजापूर शिवसेनेचा उपक्रम

राजापूर प्रतिनिधी :मालवण-कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी १७ मार्च रोजी राजापुरात एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर, रविदादा सहयोगी मित्रमंडळ व शिवसेना राजापूर यांच्यावतीने विविध राजापुर ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले.

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापुरात एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर, रविदादा सहयोगी मित्रमंडळ व शिवसेना राजापूर यांच्यावतीने दिनांक १७ ते १९ मार्च या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले.

याप्रसंगी एन. आर. प्रतिष्ठानचे रवींद्र नागरेकर, शिवसेनेचेउपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, शहर प्रमुख सौरभ खडपे, शिवसेना जि. प. सदस्य रमेश सुद, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, नगरसेवक एड. राहुल तांबे, उमिला बाकाळकर, दिलीप चव्हाण, सौरभ पेणकर, प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, शिवसेनेचे दीपक बेंद्रे वसंत पाटील, जब्बार काझी, जिलानी काझी, राजा खानविलकर, संदेश आंबेकर, सुदेश नार्वेकर, संतोष सातोसे, चंद्रकांत चव्हाण, अमोल बाकाळकर, बबन तांबे, बाळू मांजरेकर, अशोक तांबे, मधुकर बाणे, सोनम केळकर, आदित्य शिवलकर, प्रणय खानविलकर, आदींसह एन. आर. प्रतिष्ठान, रविदादा सहयोगी मित्र मंडळ व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आर्यन, डॉक्टर हर्ष आणि बुजाडे यांसह कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार व गुरूवारी विविध कार्यक्रम

बुधवारी १८ मार्च रोजी तालुक्यातील दुर्गम भागातील ४५ अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप, गुरूवारी १९ मार्च रोजी रक्तगट व हिमोग्लोबीन (महिला) तपासणी शिबीर, मराठे कॉलेज राजापूर.

तरी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती एन. आर. प्रतिष्ठान, राजापूर, रविदादा सहयोगी मित्रमंडळ व राजापूर तालुका शिवसेना यांच्या वतीने करण्यात आले आहे.