अज्ञातावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी येथील बौध्दवाडी बोरवेल ते समाजमंदिर येथील येण्या जाण्याचा रस्ता चिरे लावून अडविणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 16 मार्च रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.
याबाबत जितेंद्र जयवंत सावंत (33,रा.निवळी बौध्दवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,सोमवारी दुपारी अज्ञाताने निवळी येथील बौध्दवाडी बोरवेत ते समाजमंदिर येथील फिर्यादीच्या येण्याजाण्याचा रस्ता चिरे लावून अडवण्यात आला होता. याबाबत फिर्यादीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने तो रस्ता मोकळा करुन पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












