हरकुळ बुद्रुक – कांबळेवाडी रस्त्यावर इको कार नाल्यात कोसळली; प्रवासी बचावले

कणकवली: तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी रस्त्यावर आज सकाळी अपघात झाला. मारुती इको कार वळणावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य करत गाडीतील प्रवाशांना बाहेर काढले.