जि. प. सदस्य प्रमोद गांधी यांच्या एका कॉलने विद्युत पुरवठा सुरळीत
गुहागर | प्रतिनिधी :
तालुक्यातील तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे गेल्या अनेक महिन्याचे बिल थकीत असल्याने महावितरण कडून येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अखेर नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी याची तत्काळ दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे.
थकीत वीजबिलामुळे येथील वीज पुरवठा खंडित केल्याचे सामाजिक कार्यकर्ते व प्रा.अमोल जड्याळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या कानावर घातली. त्यानंतर तत्काळ प्रमोद गांधी यांनी स्वतः तातडीने तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रीम कांबळे यांच्याकडे येथील वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांना दूरध्वनीवरून संपर्क करून थकीत वीजबिल लवकरात लवकर भरून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले.तसेच गुहागर महावितरणचे श्री सूद व तळवली महावितरण शाखेचे अभियंता श्री फर्नांडिस यांच्याशी संपर्क करून थकीत बिल लवकरात लवकर भरणा केली जाईल मात्र तत्काळ येथील विद्युत पुरवठा सुरू करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करा असे आवाहन केले.यानंतर तत्काळ येथील विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ सुप्रिम कांबळे,प्रा . अमोल जड्याळ,मनसेचे अमित खांडेकर,पत्रकार आशिष कारेकर आदी उपस्थित होते.












