देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील गढीताम्हाणे येथे चिरेखाणीवर काम करणाऱ्या कुटुंबातील २२ वर्षीय विवाहित सौ शिल्पा सुरेश राठोड (मूळ राहणार विजापूर कर्नाटक)ही बेपत्ता असल्याची तक्रार तिचे वडील कृष्णा तुकाराम चव्हाण रा .गढीताम्हाणे (मूळ राहणार विजापूर कर्नाटक) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार
गढीताम्हाणे येथील संतोष तळेकर यांच्या चिरेखाणीवर कामास असलेल्या विजापुरी कुटुंबातील सौ शिल्पा राठोड ही १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च सकाळी ६ वाजण्याचे कालावधीत घरात कोणाला काही न सांगता निघून गेली आहे.तिचा शोध घेतला असता ती सापडून आली नाही असे तिचे वडील कृष्णा चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.











