रक्तदान शिबिराने वेंगुर्ले येथे “गरूडझेप’ महोत्सवाला प्रारंभ…

शिबिरात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्या “गरूडझेप महोत्सव २०२६’ महोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मिना पार्क, वेंगुर्ला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे ४२ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनप्रसंगी व्यासपिठावर नगरसेवक समिधा रेडकर, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, रक्तदाते देवेंद्र गावडे, जबरदस्त मंडळाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, पत्रकार भैय्या गुरव आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, डॉ.अनिल वनकुद्रे यांनीही या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचाही मंडळातर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश परब, सचिव सिद्धेश रेडकर, सहसचिव अद्वैत आंदुर्लेकर, खजिनदार स्वप्निल पालकर, सहखजिनदार विवेक राऊळ, सदस्य अजित राऊळ, बापू वेंगुर्लेकर, कौशल मुळीक, ज्ञानेश्वर रेडकर, अनंत रेडकर, हर्षद रेडकर, किरण रेडकर, सागर रेडकर, गौरव राऊळ, दिनेश पाटील, रसिक वेंगुर्लेकर, हितेश सावंत, प्रांजल वेंगुर्लेकर, हिताली वेंगुर्लेकर, अनिकेत वेंगुर्लेकर, यतिन गांवकर, सुषमा रेडकर, निल नांदोडकर, चिटू राऊळ, बबन आंदुर्लेकर, तुषार भाटकर यांच्यासह सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.मनिषा सावंत, प्राजक्ता रेडकर, रविना, मानसी बागेवाडी आणि अनिल खाडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभाराचे काम अजित राऊळ यांनी केले.