“राष्ट्रभाषा बालबोधिनी व राष्ट्रभाषा प्राथमिक” शाळा वेंगुर्ला नं ४ चा निकाल १०० टक्के..

वेंगुर्ले : प्रतिनिधी : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित “राष्ट्रभाषा बालबोधिनी व राष्ट्रभाषा प्राथमिक” शाळा वेंगुर्ला नं ४ चा निकाल १०० टक्के लागला आहे. राष्ट्रभाषा बालबोधिनी १० व राष्ट्रभाषा प्राथमिक १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुका स्तरावर प्राथमिक बालबोधिनी मध्ये तृतीय क्रमांक वेंगुर्ला शाळा नं ४ च्या कु हंसिका जगन्नाथ वजराटकर व राष्ट्रभाषा प्राथमिक द्वितीय क्रमांक कु श्रेया नरेश किनळेकर यांनी पटकाविला आहे. राष्ट्रभाषा बालबोधिनी
परिक्षा विशेष योग्यता श्रेणी मध्ये या शाळेतील वेदांत सावळाराम नाईक, वेद अभिषेक वेंगुर्लेकर, हंसिका जगन्नाथ वजराटकर, भूमिका भरत असनकर, खुशी पवित्र मठकर, आरती बसुराज कोळी, हिताला दिपक बागवे, रक्षा धनंजय तांडेल यांनी यश मिळवले.

पहली श्रेणी मध्ये नंदित नरेंद्र परब, निनाद निलेश पिंगुळी यांनी तर राष्ट्रभाषा प्राथमिक
परिक्षा विशेष याेग्यता श्रेणी मध्ये चिन्मयी दिनकर परब, चेन्नई जगदीश किनळेकर, युक्ता संजय किनळेकर, श्रेया नरेश किनळेकर, प्रार्थवी वासुदेव परब, तनिष्का गणेश जाधव, नंदिता नरेद्र परब यांनी मिळविला.
पहिली श्रेणी मध्ये संजीव शशिकांत सुर्यवंशी, गौरेश प्रविण कुबल, हर्षिता तुषार साळगावकर, सर्वेश संतोष पिंगु़ळकर यांनी दुसरी श्रेणी मध्ये गणेश ज्ञानेश्वर लाड, दिगराज धनंजय तांडेल, धनश्री आशिष किनळेकर, शशिकांत चंद्रशेखर मांजरेकर, दिपक रमेश किनळेकर, प्रियांका शरणप्पा भासगी यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री संतोष परब, श्रीम. सुनंदा खंडागळे, राजू वजराटकर, श्रीम लिना नाईक, संतोष बोडके, मुख्याध्यापक श्रीम. संध्या बेहेरे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि केंद्रप्रमुख श्री. आव्हाड तसेच विस्तार अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वासुदेव परब, पालक संघ व माता पालक संघ व सर्व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.