गुहागर :
दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो व त्या अनुषंगाने वेगवेगळ्या संकल्पना या वेगवेगळ्या वर्षी राबवल्या जातात.यावर्षीची संकल्पना ही पाणी आणि लिंगभाव यावर आधारित होती. याचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त महिला व मुलींना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे.
▶️राज्य शासनाने दिनांक 8 मार्च ते २२ मार्च या कालावधीमध्ये जल महोत्सव साजरा करण्या बाबत सूचित करण्यात आले होते. त्यामध्ये जल अर्पण दिवस साजरा करून. योजना गावाकडे सुपुर्त केली जाते त्या पार्श्वभूमीवर स्वामीत्वाचा उत्सव साजरा केला जातो.
▶️रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नळ पाणी पुरवठा योजना स्वयंसहाय्यता महीला बचत गटाकडे सुपुर्त करणेबाबत ग्रामपंचायत खामशेत ता.गुहागर जि. रत्नागिरी यांचेशी चर्चा केल्यानंतर दि. २२मार्च २०२६ रोजी सदरची योजना श्री. दत्त कृपा स्वयंसहाय्यता महीला बचत खामशेत यांचेकडे करार तत्वावर सोपवणेत आली .
▶️या कार्यक्रम साठी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश श्री. सुर्वे तसेच इतर पंचायत समितीचे सदस्या श्रीम. खैर व शिवगण तर जिल्हा स्तरावरून कार्यकारी अभियंता श्रीम. मयुरी पाटील ,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. शिरसाट उपअभियंता श्रीम. दिप्ती धारप , विस्तार अधिकारी श्री. शरद भांड, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार , प्रशासक श्री. सोलकर , ग्रामपंचायत अधिकारी श्री. मोहीरे व महीला बचत बचत गटातील सदस्या व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी होते.













