कणगवली येथील क्रिकेट स्पर्धेत पेणेवाडी संघ विजयी

फैजान-ए-कोकन फाऊंडेशनतर्फे कणगवली चॅम्पियन्स लीग २०२६ चे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कणगवली येथील फैजान-ए-कोकन फाऊंडेशनने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सहकार्याने आयोजित कणगवली चॅम्पियन्स लीग २०२६( सीझन १) क्रिकेट स्पर्धेत पेणेवाडी संघाने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन सादिक कासू व इक्बाल कासू यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत अतिशय रंगतदार झालेल्या शेवटच्या सामन्यात पेणेवाडी संघाने आर. के. बी. मुस्लिमवाडी संघाला मात देत विजय संपादन केला. विजेत्या पेणेवाडी संघाला २००० रोख पारितोषिक व विजेता ट्रॉफी मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा चे संस्थापक अकिल नाईक व अंकुश इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तर उपविजेता आर. के. बी. मुस्लिमवाडी संघाला १२०० व ट्रॉफी रहमतुल्ला कासू व दीपक इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

तसेच मॅन ऑफ द सिरीज : ओंकार इंगळे (पेणेवाडी), सर्वोत्कृष्ट गोलंदाज : आयुष इंगळे (पेणेवाडी), सर्वोत्कृष्ट फलंदाज : शोएब कासू (आर. के. बी. मुस्लिमवाडी) यांना गौरविण्यात आले.पंच म्हणून राजेश इंगळे,राजू गावकर,सफवान कासू,साबीर पठाण,हृषिकेश मोरे यांनी काम पाहिले.

या क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अन्वर कासू, उपाध्यक्ष आसिफ वाडेकर, इक्बाल कासू, सचिव जलील हाजू, सहसचिव खालिद कासू, खजिनदार हनीफ कासू, सल्लागार आरिफ पठाण आणि रफीक पठाण यांच्यासह इव्हेंट गाईड मोहसिन वाडेकर रहमतुल्ला कासू, शोएब कासू, सलमान रखांगी, फारूक पठाण, साकिब कासू, इरशाद कासू, साद कासू, मुहिब कासू, मोईन कासू, जमील हाजू, शायान पठाण, झैद कासू, खलीक रखांगी, अझहर कालसेकर, साबिर पठाण, साहिल हाजू आणि अझलान कासू यांनी सहकार्य केले.