नाचणे येथे तरुणाच्या गळ्यातली चेन जबरदस्तीने काढणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या नाचणे बसस्टॉपजवळ तरुणाच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने काढून घेणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 29 ज्ाुलै रोजी दुपारी 3.30 वा.घडली आहे. अव्दैत संदेश चवंडे,रौफ इक्बाल डोंगरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,शनिवारी दुपारी ते नाचणे बसस्टॉपजवळ उभे असताना अव्दैत चवंडे आणि रौफ डोंगरकर हे दोघे तिथे आले अव्दैतने फिर्यादीला तुझ्या गळ्यातील चेन मला दे असे ओरडून सांगून रौफने फिर्यादीच्या खांद्यावर हात ठेवला.त्यानंतर अव्दैतने फिर्यादीच्या गळ्यातील चेनचा फासा काढला.फिर्यादीने त्या दोघांनाही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतू दोघांनीही त्याला शिवीगाळ व दमदाटी करुन ढकलून देत दुचाकीवरुन पळ काढला.या प्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 392,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.