सोनाळीत वयोवृद्ध महिलेचा खून : तालुक्यात खळबळ

 

संशयित पोलिसांच्या ताब्यात

वैभववाडी | प्रतिनिधी : तालुक्यात एका 65 वर्षीय वयोवृद्धेचा खुन झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. खुनातील संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सोनाळी वाणीवाडी येथे ही घटना घडली आहे. जयश्री रामदास साटम (थोटम) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाळी वाणीवाडी येथे जयश्री एकट्याच राहत होत्या. कामानिमित्त गावातील एक जण मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या घरी गेला. त्यांनी हाक मारली परंतु दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने दरवाजा उघडला असता जयश्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने व शेजा-यानी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस रात्रीच घटनास्थळी पोहोचले. आज सकाळी पोलिसांनी एका संशियताला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.