वैभववाडीत नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य क्रिकेट स्पर्धा
देशभरातील खेळाडूंनी गाजवला नाधवडेतील क्रिकेट महोत्सव
वैभववाडी l प्रतिनिधी : नाधवडे येथील सिंधूनायक चषक क्रिकेट स्पर्धेत ए.के. स्पोर्ट्स वरवडे संघाने विजेतेपद पटकावीले. तर पेरणेम स्ट्राकर्स गोवा संघ उपविजेता ठरला. अखेरच्या दिवशी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. अंतिम सामना पाहण्यासाठी उच्चांकी गर्दी पहायला मिळाली.
माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधूनायक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नाधवडे येथील महादेव मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना ए. के. स्पोर्ट्स वरवडे व पेरणेम स्ट्रायकर्स गोवा यांच्यात झाला. या अंतिम सामन्यात अचित कदम यांच्या मालकीचा ए.के. स्पोर्ट्स वरवडे संघाने जिंकला. विजेत्या संघाला 5 लाख 75 हजार 575 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. गोवा येथील महेश कोणाडकर यांच्या मालकीच्या पेरणेम स्ट्रायकर्स गोवा या संघाला 2 लाख 75 हजार 575 व चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्य फेरीतील पराभूत संघ अवधूत स्पोर्टस कणकवली मालक अवधूत तळगावकर तसेच भैरीभवानी इलेव्हन वैभववाडी मालक सिद्धेश रावराणे या दोन्ही संघांना प्रत्येकी 50 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
मालिकावीर किताब प्रितम बारी, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अमित, उत्कृष्ट फलंदाज महेश नानगुडे, श्रेयस कदम, पेरनेम गोवा यांना गौरविण्यात आले. खासदार नारायण राणे साहेबांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 धावा करणारा संघ भैरीभवानी इलेव्हन वैभववाडी, या संघाला 7777 देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत गुजरात, हरियाणा, गोवा, पंजाब, वेस्ट बंगाल येथून दाखल झालेले खेळाडू स्पर्धेचे आकर्षण राहिले. प्रीतम बारी याला मालिकावीर घोषित करण्यात आले. या सामन्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातील महाराष्ट्रातील स्टार खेळाडू केतन म्हात्रे, कृष्णा सातपुते, फरदीन काझी, सरोज प्रामाणिक, संस्कार ध्यानी, गौरेश नागवेकर, रजत कुडाळकर, विकी भोईर, उस्मान पटेल, किरण पवार, आकाश तारेकर यांनी खेळ दाखवला. या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून कुणाला दाते, अमोल जमदाडे, बादल चौधरी, प्रदीप देऊळकर, प्रसाद परब यांनी काम पाहिले. पंच म्हणून राजू वायंगणकर, अमोल मिस्त्री, मनोज सुतार, श्री कोठारकर यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून श्री लिंगायत यांनी काम पाहिले.
अंतिम स्पर्धेच्या दिवशी खासदार नारायण राणे, नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी हजेरी लावली. कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाच्या वतीने या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पार पडली. नाधवडे येथील महादेव मैदानावर राणेसाहेबांचे आगमन होताच ढोल ताशाचा गजर व फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली. यावेळी राणे साहेब यांनी आयोजक व सर्व कार्यकर्त्यांचे तोंड भरून कौतुक केले. आयोजकांच्या वतीने साहेबांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मैदानावर 75 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ही स्पर्धा पाच दिवस प्रकाश पार पडली. स्पर्धा पाहण्यासाठी शेवटच्या दिवशी गोवा, राजापूर, गोवा, कोल्हापूर सिंधुदुर्ग, कर्नाटक या भागातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. अंतिम दिवशी कार्यक्रमाला निवेदक म्हणून निलेश पवार, रेश्मा मयेकर यांनी काम पाहिले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी महापौर चंदू रावराणे, भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुळशीदास रावराणे, जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, दिलीप तळेकर, प्रभानंद रावराणे, उपसभापती साची कोलते, विजय तावडे, प्राची तावडे, शारदा कांबळे, साधना नकाशे, बंडया मांजरेकर, सुरेश सावंत, बाप्पी मांजरेकर, नासीर काझी, संदीप साटम व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












