जैन धर्म हा प्राचीन तरीही क्रांतिकारक

देवगड (प्रतिनिधी)

जैन धर्म हा प्राचीन धर्म असून तो क्रांतिकारक धर्म होता. कोकणातील अनेक भागात आणि त्याच प्रमाणे गोव्यातही जैन धर्माची अनेक संचित यापूर्वी ही होती आणि आजही आढळून येत आहेत. अंध युगामधून सत्य युगा कडे पोहोचविण्याचा संदेश अहिंसा परमो धर्म: हा भगवान महावीरांनी दिला. असून प्रामुख्याने गोव्यात जैन धर्माची मोठी संस्कृती होती आणि त्याचबरोबर कदंब कालीन मंदिरेही होती ती उध्वस्त केली गेली.

कोकणात जैन धर्माचे संचित म्हणून पाहावयाचे झाल्यास खारेपाटण येथील बाजारपेठ जैन मंदिरे ही जैन धर्माची जैन संस्कृती मोठी केंद्र आहे.येथील जैन धर्माची संचिती आढळली जैन धर्म हा प्राचीन धर्म असून पर्यावरण क्षेत्रात जैन धर्म हा पहिला धर्म सजीवांबरोबर निर्जीवांबरोबर प्रेम करायला शिकविणारा धर्म असून सजीवां बरोबर निर्जीवांना देखील त्यांनी देवत्व दिले आहे.त्यामुळे २४ तीर्थनकराची चिन्ह ही सजीवांबरोबर निर्जीव असली तिच्यात त्यांनी देवत्व दिलेले आहे.हे जैन धर्माचे तत्त्वज्ञान प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणले त्या निश्चितपणे आपल्या जीवनाचे सोने होईल. हिंसेला रोखण्यासाठी अहिंसा परमो धर्म या तत्त्वज्ञानाची आज आवश्यकता असून ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचे आचरण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जैन इतिहास व पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी बोर्डवे येथे भगवान महावीर जन्म कल्याण उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार यांच्या वतीने ३१ मार्च रोजी जैन मंदिर बोर्डवे येथील जैन मंदिरात २६ स्नेहसंमेलन व भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अजित आप्पासाहेब पाटील तसेच प्रमुख मार्गदर्शक वक्ते जैन इतिहास व पर्यावरण अभ्यासक राजेंद्र

केरकर यांच्यासमवेत सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे अध्यक्ष डॉ. दीपक तुपकर महिला अध्यक्ष सौ दीपिका बिजीतकर ज्येष्ठ सल्लागार बाळासाहेब

डोर्ले उपाध्यक्ष रवींद्र पोकळे सहसचिव राजाराम दंताळ खजिनदार महावीर मागले दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.दीपक तुपकर यांनी करून मान्यवरांचा परिचय डॉक्टर सौ संगीता तुपकर आणि सूत्रसंचालन पदमा दंताळ यांनी केले.

या सोहळ्याच्या निमित्ताने जैन समाजातील गुणवंत विद्यार्थी संमेद उपाध्ये त्याचप्रमाणे ज्येष्ठ सल्लागार मार्गदर्शक बाळासाहेब डोर्ले अध्यक्ष अजित पाटील प्रमुख वक्ते रवींद्र केरकर पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या निमित्ताने उ

या सोहळ्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत छोट्या गटात वाणी बिजितकर अद्वैता पोकळे आणि मोठ्या गटात दीपिका बीजीतकर आणि प्राजक्ता पोकळे यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांच्याही प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास अध्यक्ष उद्योजक अजित पाटील जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर, अल्पसंख्यांक संघटनेचे अध्यक्ष रफिक बोबडे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच सावंतवाडी येथील सुराणा परिवार प्रीती जैन उर्फ नंदिनी कोयघाडी यांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.आभार नितीन जठार यांनी मानले.